जिल्ह्यात तब्बल 3013 कुपोषित बालके!

Foto

औरंगाबाद:  जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या पाहणीअंती जिल्हाभरात तब्बल 3013 बालके कुपोषित असल्याचे आढळून आले. त्यात 147 बालके अतिकुपोषित आहेत. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने एनर्जी डेसीफाईड न्युट्रिअस फुड, देण्यावर भर दिला जाणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले. 

मार्च-एप्रिल महिन्यात हा सर्व्हे करण्यात आला. त्यात शुन्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची शारिरीक तपासणी करण्यात आली असता जिल्हाभरात 3013 बालके कुपोषित असल्याचे निदर्शनास आले. या बालकांच्या पालकांनी आपल्या कुपोषित मुलांना कुपोषणापासुन मुक्त करण्यासाठी काय करावे व शासन स्तरावरुन त्यांना कोणती मदत केली जाते. याविषयी जनजागृती करण्यात आली. शिवाय प्रशासन पातळीवर या मुलांना कॅलरीज युक्त पोषक अहार देणारी महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी, कर्मचारी तसेच अंगणवाडीसेविका-मदतनिस यांना आपल्या यंत्रणेला अधिक सक्रीय होण्याविषयी सुद्धा सुचना देण्यात आल्या. अतिकुपोषीत बालकांना ग्राम बालविकास केंद्रात ठेऊन खिचडी उसळ आदी खाद्य पदार्थ देण्यात येत असल्याचेही मिरकले यांनी सांगितले.